TSK

TSK · मत्त. 8:29

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पण राजा त्यास म्हणाला, सरुवेच्या पुत्रांनो मी काय करू? दाविदाला शिव्याशाप दे असे परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल. मग त्यास असे कोण म्हणू शकेल की, तू राजाला का शाप देत आहेस?”

तेव्हा ती स्त्री म्हणाली, “एलीया, तू तर देवाचा मनुष्य आहेस, मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?”

तेव्हा परीक्षक येशूंची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”

जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!”

हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस.

तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस.

ती पौलाच्या व आमच्या मागे येऊन मोठ्याने म्हणाली, “हे लोक परात्पर देवाचे दास आहेत, हे आपणाला तारणाचा मार्ग कळवितात.”

कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले;