TSK

TSK · मीखा 1:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वराच्याच पुढाकाराने त्याने या डोंगराळ प्रदेशाचा ताबा घेतला. मग याकोबाने शेतात भरपूर पीक घेतले. परमेश्वराने त्यास खडकातून मध दिला, त्या कठीण खडकातून त्याच्यासाठी तेलही काढले.

होय त्या गर्विष्ठांकडे बघ आणि त्यांना नम्र कर वाईट लोकांस जागच्या जागी चिरडून टाक.

खडकाळ जागी जा व परमेश्वराच्या भयापासून व त्याच्या वैभवी गौरवापासून जमिनीत लप.

कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.

¶ अहा! जर तू स्वर्ग दुभंगला आणि खाली उतरून आलास! तर पर्वत तुझ्या उपस्थितीत थरथरतील,

हयास्तव मी एफ्राईमास सिंह आणि यहूदा घराण्यास तरुण सिंहासारखा होईन; मी, हो मीच त्यांना फाडून टाकीन व घेऊन जाईन, आणि त्यांना सोडविणारा कोणी नसेल.

आणि ज्याने भूमीला स्पर्श केला म्हणजे ती वितळते, आणि त्यामध्ये राहणारे सर्व शोक करतात, तो प्रभू, सैन्यांचा परमेश्वर आहे, आणि त्यातील सर्व नदीप्रमाणे उठणार व मिसरच्या नदीप्रमाणे पुन्हा बुडणार.