TSK

TSK · मीखा 7:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

पत्रातला मजकूर असा होता: “एक दिवस उपवासाची घोषणा करा. मग गावातल्या लोकांस एकत्र बोलवा. तिथे नाबोथविषयी बोलणे होईल.

जो कोणी मनुष्य कुटिल गोष्टीच्या योजणेला डोळे मिचकावतो; जो आपले ओठ आवळून धरतो तो दुष्कर्म घडून आणतो.

कारण पाहा, परमेश्वर पृथ्वीतल्या राहणाऱ्यांच्या अन्यायाबद्दल शिक्षा करण्यास आपले स्थान सोडून येत आहे. मारल्या गेलेल्यांचे रक्त पृथ्वी प्रगट करेल, आणि आपल्या वधलेल्यांना यापुढे झाकून ठेवणार नाही.

कारण देव म्हणतो, “माझे लोक मूर्ख आहेत, ते मला ओळखत नाहीत. ती मूर्ख लोक आहेत आणि त्यांना काहीएक समजत नाही. दुष्कृत्ये करण्यात ते पटाईत आहेत पण चांगले करायचे त्यांना ज्ञान नाही.”

¶ पहा, इस्राएलाच्या शास्त्यानो तुमच्या स्वबळाने रक्तपात केला आहे.

तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. आणि जी सर्व दुर्बळ झालेली त्यांना तुम्ही देशा बाहेर घालवून लावीपर्यंत त्यांना तुम्ही भोसकता,

कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे, आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्ये केली आहेत. तुम्ही लाच घेता, धार्मिकाला त्रास देता, आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता.

यहूदा म्हणाला, “मी येशूला धरून तुमच्या हाती दिले तर तुम्ही मला काय द्याल?” तेव्हा त्यांनी त्यास चांदीची तीस नाणी दिली.

म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.