TSK

TSK · नहे 12:39

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ मग मुख्य याजक एल्याशीब आपल्या याजक भावांबरोबर उठला आणि त्यांनी मेंढेवेस बांधली. त्यांनी ती पवित्र करून दरवाजे त्याच्याजागी बसवले. हमेआ बुरुजापर्यंत आणि हनानेल बुरुजापर्यंत ती त्यांनी पवित्र केली.

¶ यहोयादा आणि मशुल्लाम यांनी जुन्या वेशीची दुरुस्ती केली. यहोयादा पासेहाचा पुत्र आणि मशुल्लाम बसोदयाचा पुत्र. यांनी तुळया बसवल्या आणि दरवाजे बिजागऱ्यांनी जोडले, नंतर कड्या व अडसर बसवले.

¶ मंदिराचे सेवेकरी आणि व्यापारी यांच्या घरापर्यंतच्या भिंतीच्या भागाची दुरुस्ती सोनारांपैकी मल्कीया याने केली. हा भाग तपासणी वेशीसमोर येतो. भिंतीच्या कोपऱ्यावरील खोलीपर्यंतच्या भिंतीची दुरुस्ती मल्कीयाने केली.

¶ “पाहा असे दिवस येत आहेत की; असे परमेश्वर म्हणतो, परमेश्वरासाठी हनानेलाच्या बुरुजापासून कोपऱ्याच्या वेशीपर्यंत हे नगर पुन्हा बांधले जाईल.

परमेश्वर असेही म्हणाला, त्या दिवशी, मासळी दारातून आक्रंदनाचा आवाज येईल, दुसऱ्या भागातून आकांत आणि टेकड्यांवरून मोठा धडाक्याचा आवाज होईल.