TSK

TSK · गण 10:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग ते सुक्कोथ नगराहून रवाना झाले व रानाजवळील एथामात त्यांनी तळ दिला.

पवित्र निवास मंडपावरील मेघ वर जाई तेव्हा इस्राएल लोक आपला पुढील प्रवास सुरू करीत;

¶ तेव्हा परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञाप्रमाणे सर्वकाही इस्राएल लोकांनी केले. प्रत्येक कुळाने आपआपल्या निशाणापाशी तळ दिला. प्रत्येकजण आपापल्या कुळात व आपापल्या वाडवडिलांच्या घराण्यांच्या छावणीत राहिला.

तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले.

¶ तेव्हा मोशेने परमेश्वराची आज्ञा मानून, लोक पारानाच्या रानात असताना हे सरदार पाठवले. ते सर्व इस्राएलाच्या वंशातील होते.

¶ लोकांनी रफीदिम सोडले व त्यांनी सीनाय रानात तळ दिला.

¶ यार्देन नदीच्या पूर्वेकडील रानात अराबामध्ये सुफासमोर, पारान, तोफेल, लाबान, हसेरोथ व दि-जाहाब यांच्या दरम्यान मोशे सर्व इस्राएलाशी वचने बोलला ती ही.

¶ मग आपला देव परमेश्वर ह्याच्या आज्ञेनुसार आपण होरेबहून पुढे अमोऱ्यांच्या डोंगराळ प्रदेशाकडे निघालो तेव्हा वाटेत तुम्हास ते विस्तीर्ण आणि भयंकर रान लागले ते सर्व ओलांडून आपण कादेश-बर्ण्याला पोहचलो.

¶ शमुवेल मरण पावला तेव्हा सर्व इस्राएल लोकांनी एकत्र जमून त्याच्यासाठी शोक केला आणि त्यांनी त्यास रामा येथे त्याच्या घरात पुरले. दावीद उठून खाली पारान नावाच्या रानात गेला.

तेमानाहून देव येत आहे, पारान पर्वतावरून पवित्र परमेश्वर येत आहे, सेला. परमेश्वराचे वैभव स्वर्ग झाकते, आणि त्याच्या स्तुतीने पृथ्वी भरली.