TSK

TSK · गण 3:13

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“इस्राएली लोकांमध्ये मनुष्याचा व पशूचा या दोहोंचे प्रत्येक प्रथम जन्मलेले सर्व नर माझ्यासाठी पवित्र कर. प्रथम जन्मलेले ते माझे आहेत.”

आणि फारो आम्हांस मिसर सोडून जाऊ देईना, तेव्हा परमेश्वराने मिसर देशामधील मनुष्य व पशू यांचे सर्व प्रथम नर मारून टाकले; आणि म्हणूनच आम्ही उदरातून निघालेल्या सर्व प्रथम नरांचा मी परमेश्वरास बली अर्पितो. पण माझे सर्व ज्येष्ठ पुत्र देऊन सोडवून घेतो.

प्रत्येक प्रथम जन्मलेला माझा आहे; तसेच तुझ्या गुरांढोरापैकी गायीचे व मेंढराचे प्रथम जन्मलेले नरवत्स माझे आहेत.

आता मी इस्राएलाचे प्रथम जन्मलेले पुत्र व पुरुष घेणार नाही, त्याऐवजी मी परमेश्वर, लेवी वंशाचे लोक घेईन, तसेच इस्राएल लोकांच्या प्रथम जन्मलेल्या पशूंच्या ऐवजी लेवी लोकांच्या पशूंचे प्रथम जन्मलेले घेईन.”

¶ इस्राएल मधल्या सर्व लोकांतून मीच लेवी वंशाच्या लोकांस निवडले. ते तुझ्यासाठी एक भेट आहे. त्या लोकांस मी तुला दिले. ते परमेश्वराची सेवा करतील आणि दर्शनमंडपामध्ये काम करतील.

मिसर देशाचे लोक परमेश्वराने मारलेल्या लोकांचे दफन करीत होते. ते त्यांच्या पहिल्या मुलांचे दफन करीत होते. परमेश्वराने मिसर देशाच्या देवतांना कडक शासन केले.

म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.