TSK

TSK · गण 31:47

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

परमेश्वराने मोशे व अहरोन यांना आज्ञा दिली होती म्हणून इस्राएल लोकांनी त्यांच्या सांगण्याप्रमाणे केले.

¶ लेवीचे वंशज दर्शनमंडपाची सेवा करतात तिच्याबद्दल इस्राएल लोकांकडून जे सर्व दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहे.

आपण राहतो तेथे काही गोष्टी खाणे निषिद्ध आहे. त्या म्हणजे, देवाच्या वाट्याचे धान्य, नवीन द्राक्षरस, तेल, कळपातील पहिला गोऱ्हा, देवाला स्वखुशीने अर्पण करायच्या वस्तू नवस फेडण्याच्या गोष्टी, आणखी काही देवाला अर्पण करायच्या खास गोष्टी वगैरे.

परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.

¶ यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्याठिकाणी तो स्वतः जाणार होता तेथे दोघे असे त्यांना आपल्यापुढे पाठवले.