TSK

TSK · गण 33:55

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

कारण ते लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजन पूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील. खोट्या देवांचा नाश करा

तुमच्याजवळ जी राष्ट्रे उरलेली आहेत त्यांमध्ये तुम्ही जाऊ नका, आणि त्यांच्या देवांच्या नावांची आठवण करू नका, आणि त्यांची शपथ घालू नका; त्यांची सेवाही करू नका, आणि त्यांच्या पाया पडू नका.

तर तुम्ही हे पक्के समजा की यापुढे तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांना तुमच्या नजरेपुढून आणखी घालवणार नाही; आणि जी ही उत्तम भूमी तुमचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिली, तिच्यावरून तुम्ही नाश पावून जाल तोपर्यंत ती तुम्हाला सापळा व पाश व तुमच्या पाठीला चाबूक व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.

आणि म्हणून मी देखील म्हणालो, मी कनानी लोकांस तुमच्यासमोरून घालवून देणार नाही; पण ते तुमच्या कुशीला काट्यासारखे होतील आणि त्यांचे देव तुम्हाला पाश होतील.”

नंतर इस्राएलाच्या घराण्याच्या सभोवतालचे जे सर्व तिला तुच्छ मानत असत त्यांच्यातून कोणीही त्यांना बोचणारी काटेरी झुडुपे किंवा वेदनादायक काटे असे उरणार नाहीत, म्हणून त्यांना समजून येईल की, मीच प्रभू परमेश्वर आहे.