TSK

TSK · गण 36:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ मग योसेफाचा मुलगा मनश्शे ह्याच्या कुळातला सलाफहाद हेफेरचा मुलगा होता. हेफर गिलादाचा मुलगा होता. गिलाद माखीरचा मुलगा होता. माखिर मनश्शेचा मुलगा होता. सलाफहादला पाच मुली होत्या. त्यांची नावे महला, नोआ, होग्ला, मिल्का व तिरसा.

तुमच्यातील प्रत्येक कुळाने चिठ्ठ्या टाकून देश वतन करून घ्या. मोठ्या कुळाला जमिनीचा मोठा भाग मिळेल. लहान कुळाला लहान भाग मिळेल. एखाद्या ठिकाणासाठी ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल ते त्याचे वतन होईल. आपआपल्या वाडवडिलांच्या वंशाप्रमाणे तुम्हास वतन मिळेल.

¶ आणि कनान देशात इस्राएलाच्या लोकांनी जी वतने घेतली, म्हणजे एलाजार याजक व नूनाचा पुत्र यहोशवा व इस्राएल लोकांच्या वंशाच्या वडिलांच्या घराण्याचे पुढारी यांनी त्यास जी वतने दिली ती ही आहेत.

¶ त्याच्या मुली त्या देशातील सर्वात सुंदर मुली होत्या, ईयोबाने त्याच्या मुलींना त्याच्या मालमत्तेतला वाटा दिला. त्यांच्या भावांप्रमाणे ईयोबाच्या मालमत्तेतला वाटा त्यांना मिळाला.