TSK

TSK · गण 8:26

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अहरोनाचा मुलगा एलाजार याजक हा लेवी लोकांच्या पुढऱ्यांचा पुढारी होता. पवित्र वस्तूचे रक्षण करण्याचे काम ज्यांच्यावर सोपवले होते त्या सर्वांवर देखरेख करणारा तो प्रमुख होता.

¶ “नंतर इस्राएल लोकांस मिळालेल्या हिश्श्यातून माणसे, गाईबैल, गाढवे, शेरडेमेंढरे वगैरे सर्व पशू ह्यांच्यापैकी प्रत्येक पन्नासांमागे एक घेऊन परमेश्वराच्या निवासमंडपाची रक्षण करणाऱ्या लेव्यांना द्यावे.”

¶ देवाच्या मंदिरातील भांडारावर आणि समर्पित वस्तूंच्या भांडारावर लेव्यातला अहीया हा प्रमुख होता.

ते माझ्या पवित्रस्थानातले सेवक आहेत, ते मंदिराच्या द्वारांचे पहारेकरी आणि मंदिरात सेवा करणारे आहेत. ते लोकांसाठी होमार्पणे व यज्ञबली याचे पशू कापतील; ते त्यांच्यापुढे त्यांची सेवा करायला उभे राहतील.