आणि देव लोकांस म्हणाला, परमेश्वराची भीती बाळगा व त्यास मान द्या हेच शहाणपण आहे, वाईट गोष्टी करु नका तोच समजूतदारपणा आहे.”
TSK
TSK · नीति 13:19
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
वाईट कृत्ये करणे सोडून दे आणि चांगली कृत्ये कर. शांतीचा शोध कर आणि तिच्यामागे लाग.
तू आपल्याच दृष्टीने ज्ञानी असू नकोस; परमेश्वराचे भय धर आणि वाईटापासून दूर राहा.
कराराचा प्रामाणिकपणा व विश्वसनीयता ह्यांच्या योगाने पापांचे प्रायश्चित होते, आणि परमेश्वराचे भय धरल्याने, लोक वाईटापासून वळून दूर राहतील.
रक्तपिपासू सात्विकाचा द्वेष करतात, आणि सरळ मनुष्यास ठार मारण्यासाठी ते त्याचा शोध घेतात.
मी पहारेकऱ्यांना सोडून निघाले होते. इतक्यात ज्याच्यावर माझा जीव प्रेम करतो तो माझा प्राणप्रिय मला सापडला. मी त्यास धरले. मी त्यास जाऊ दिले नाही. मी त्यास माझ्या आईच्या घरी नेले. जिने माझे गर्भधारण केले तिच्या खोलीत आणीपर्यंत मी त्यास सोडले नाही.
मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.