TSK

TSK · नीति 14:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्या वेळी योसेफ मिसरचा अधिपती होता. तो देशातल्या सर्व लोकांस धान्य विकत असे. योसेफाचे भाऊ त्याच्याकडे आले आणि त्यांनी आपली तोंडे भूमीकडे करून खाली वाकून नमन केले.

मग फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. फारो त्यांना म्हणाला, “हे बेडूक माझ्यापासून, व माझ्या लोकांपासून दूर करण्याकरिता तुमच्या परमेश्वरास विनंती करा. मग तुमच्या परमेश्वराची उपासना करण्याकरिता मी तुम्हा लोकांस जाऊ देईन.”

मग हे सर्व तुमचे दास म्हणजे मिसरी लोक माझ्या पाया पडून माझी उपासना करतील. ते म्हणतील, तुम्ही तुमच्या सर्व लोकांसह व परिवारासह येथून निघून जा.” मग त्यानंतर रागाने संतप्त होऊन मोशे फारोला सोडून निघून गेला.

यहोशाफाट म्हणाला, “परमेश्वराचे वचन त्याच्या सोबत आहे.” तेव्हा इस्राएलाचा राजा व यहोशाफाट आणि अदोमचा राजा खाली त्याच्याकडे गेले.

ते कळपाप्रमाणे नेमलेले आहेत, जे मृतलोकांत जातात. मरण त्यांचा मेंढपाळ आहे. सरळ त्यांच्यावर धनीपण करतील असे सामर्थ्य त्यांना असेल.

ज्यांनी तुला दुखावले, तेच आता तुझ्यापुढे नमतील, ते तुझ्या पायावर झुकतील. ते तुला परमेश्वराचे नगर म्हणतील, इस्राएलाच्या पवित्राचे सियोन म्हणून संबोधतील.

राष्ट्रे ते चमत्कार पाहतील व आपल्या सर्व बलाविषयी लज्जित होतील. ती आपला हात आपल्या मुखाला लावतील, त्यांचे कान बहिरे होतील.

मग त्यांनी येऊन त्यांची समजूत घातली; आणि त्यांना बाहेर आणून नगरातून निघून जाण्याची विनंती केली.