TSK

TSK · नीति 16:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

¶ त्यानंतर आपल्या वडिलाने त्यास जो आशीर्वाद दिला होता त्यामुळे एसाव याकोबाचा द्वेष करू लागला. एसाव त्याच्या मनात म्हणाला, “माझ्या पित्याकरिता शोक करण्याचे दिवस जवळ आले आहेत. त्यानंतर मी माझा भाऊ याकोब याला ठार मारीन.”

तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.”

यहूदाच्या आसपासच्या राजसत्तांनी परमेश्वराची धास्ती घेतली, त्यामुळे त्यांनी यहोशाफाटाबरोबर युध्द केले नाही.

मग या लोकांनी राजाने दिलेला आदेश राजाच्या अधिकाऱ्यांना तसेच नदीच्या अलीकडे भागावरच्या अधिकाऱ्यांना दिले. तेव्हा या सर्व अधिकाऱ्यांनी इस्राएल लोकांस आणि देवाच्या घराला सहाय्य केले.

परमेश्वर म्हणाला, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला तारले नाही काय? खचित संकटे आणि दुःखाच्यावेळी शत्रू तुझ्याजवळ मदतीस विनंती करत येतील असे मी करीन.

¶ शौल यरूशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला.

¶ मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण?

ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास, प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्यास शोभेल असे जगावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.

त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.