TSK

TSK · नीति 17:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग अबीगईल नाबालाकडे आली आणि पाहा त्याने आपल्या घरी राजाच्या मेजवाणीसारखी मेजवाणी केली होती. तेव्हा नाबालाचे मन त्याच्या आत संतुष्ट होते कारण तो मद्य पिऊन फार मस्त झाला होता, म्हणून तिने पहाट उजाडेपर्यंत त्यास अधिक उणे काहीच सांगितले नाही.

¶ तेव्हा हग्गीथ्थेचा पुत्र अदोनीया स्वत:ला उंच करून म्हणाला, “मी राजा होईन.” त्याने स्वत:समोर रथ, घोडे तयार केले आणि रथापुढे धावायला पन्नास माणसे ठेवली.

कोणीतरी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे, तसे भांडणाला सुरवात होण्यासारखे आहे, म्हणून भांडण होण्यापूर्वीच त्यापासून दूर निघून जा.

तू आपले बाहेरचे काम आधी कर, आणि शेतात प्रत्येक गोष्ट स्वतःसाठी सज्ज कर, आणि मग आपले घर बांध.

रागावलेला मनुष्य संकटे आणतो; आणि क्रोधी मनुष्याकडून पुष्कळ अपराध घडतात.

¶ जो वृक्ष तू पाहीला, जो वाढून मजबुत झाला आणि ज्याचा शेंडा आकाशात गेला ज्यास सर्व पृथ्वीवरून पाहता येत होते.

कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.