TSK

TSK · नीति 19:15

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

असे म्हणशील तर दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे आणि तुझी गरिबी हत्यारबंद मनुष्यासारखी येईल.

जो कोणी आपल्या कामात निष्काळजी आहे तो नाश करणाऱ्याचा भाऊ आहे.

झोपेची आवड धरू नकोस, धरशील तर दरिद्री होशील; आपले डोळे उघड आणि तुला भरपूर खायला मिळेल.

कारण मद्य पिणारे आणि खादाड गरीब होतात, झोपेत वेळ घालवणारा चिंध्यांचे वस्त्र घालील.

त्यांचे सर्व पहारेकरी आंधळे आहेत; त्यांना समजत नाही; ते सर्व मुके कुत्रे आहेत; ते भुंकू शकत नाहीः ते स्वप्न पाहणारे, पडून राहणारे व निद्राप्रीय आहेत.

कारण त्या सर्वावर तो प्रकाश चमकतो म्हणून असे म्हणले आहे “हे झोपलेल्या जागा हो, आणि मरण पावलेल्यातून ऊठ, आणि ख्रिस्त तुझ्यावर प्रकाशेल.”