TSK

TSK · नीति 20:12

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मग परमेश्वर त्यास म्हणाला, “मनुष्याचे तोंड कोणी केले? मनुष्यास मुका किंवा बहिरा, आंधळा किंवा डोळस कोण करतो? मी परमेश्वरच की नाही?

माझे डोळे उघड म्हणजे तुझ्या नियमशास्रातील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील.

‹मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.”›

मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;