TSK

TSK · नीति 24:7

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्याची मुले सुरक्षिततेपासून फार दूर आहेत, ते शहराच्या वेशीत चिरडले जातील. त्यांना तारणारा कोणीही राहणार नाही

माझे समर्थक शहराच्या दरवाजाजवळ जवळ पाहून जर मी पोरक्यावर हात उगारत असेल

हे परमेश्वरा, तुझी कृत्ये किती महान आहेत, तुझे विचार फार गहन आहेत.

सुज्ञाने खाली अधोलोकास जाऊ नये म्हणून त्याचा जीवनमार्ग वर जातो.

गरीब मनुष्यास लुटू नको, कारण तो गरीबच आहे, किंवा गरजवंतावर वेशीत जुलूम करू नकोस.

जो कोणी स्वतःसाठी बोलू शकत नाही त्यांच्यासाठी बोल, गरीबांच्या हक्कांसाठी आपले तोंड उघड.

जे मनुष्यांना शब्दाने खोटे पाडतात. ते त्याच्यासाठी पाश मांडतात जे वेशीत न्याय शोधतात आणि नीतिमानास खोटेपणानी दाबून टाकतात.

कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे, आणि तुम्ही खरोखरच खूप वाईट कृत्ये केली आहेत. तुम्ही लाच घेता, धार्मिकाला त्रास देता, आणि वेशींत गरिबांचा न्याय विपरीत करता.

स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात.