TSK

TSK · नीति 27:21

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

त्या स्त्रिया नाचत असता एकमेकीस उत्तर देऊन असे गात होत्या की, “शौलाने हजारास मारले आणि दावीदाने दहा हजारास मारले.”

नंतर पलिष्ट्यांचे सरदार लढायास बाहेर आले आणि असे झाले की ते आले असता दावीद शौलाच्या सर्व चाकरापेक्षा चतुराईने वर्तला आणि त्याचे नाव प्रसिद्ध झाले.

राजा दावीदाकडे न्याय मागण्यासाठी आलेल्या सर्व इस्राएलांना त्याने अशाच प्रकारची वागणुक देऊन सर्व इस्राएलांची मने जिंकली.

परमेश्वराची वचने शुध्द वचने आहेत, पृथ्वीवर भट्टीत घालून गाळलेल्या, सात वेळा गाळलेल्या चांदी सारखी ती शुद्ध आहेत.

चांदी मुशीत आणि सोने भट्टीत तावून पाहतात, पण परमेश्वर हृदय शुध्द करतो.

आणि तो चांदी गाळणारा व स्वच्छ करणारा असा बनेल, आणि तो लेवीच्या संतानास शुद्ध करेल. तो त्यांना सोन्याप्रमाणे आणि चांदीप्रमाणे शुध्द करेल आणि ते न्यायीपणाने परमेश्वरास अर्पण करतील.

¶ प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.