TSK

TSK · नीति 3:24

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मी तुमच्या देशाला शांतता देईन; तुम्ही शांतीने झोपी जाल; तुम्हास कोणाची भीती वाटणार नाही, मी हिंस्र पशूंना तुमच्या देशाबाहेर ठेवीन आणि तुमच्या देशावर कोणी सैन्य चाल करून येणार नाही.

तू विश्रांती घेण्यासाठी आडवा होशील आणि तुला कोणीही त्रास देणार नाही. खरोखर, तुझ्याकडे पुष्कळ लोक मदतीसाठी येतील.

जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत, त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.

रात्रीच्या दहशतीचे भय, किंवा दिवसा उडणाऱ्या बाणाला,

तुम्ही पहाटे लवकर उठता, रात्री उशीराने घरी येता, किंवा कठोर परिश्रम करून भाकर खाता हे सर्व व्यर्थ आहे कारण परमेश्वर आपल्या प्रियजनास लागेल ते झोपेतही देतो.

परमेश्वरास आदर द्या तो त्यास पात्र आहे; आणि तो जीवनाकडे नेतो, आणि ज्या कोणाकडे ते आहे तो समाधानी आहे, आणि त्याची संकटांनी हानी होणार नाही.

यानंतर, मी जागा झालो आणि माझ्या लक्षात आले की, माझी झोप ताजीतवानी करणारी होती.

मग मी त्यांच्याबरोबर एक शांततेचा करार करीन आणि दुष्ट वन्य पशू देशातून नाहीसे करीन, मग माझ्या मेंढ्या वाळवंटातही सुरक्षित राहतील आणि रानात झोपतील.

¶ पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे.