TSK

TSK · नीति 6:9

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

अहो तुम्ही मूर्ख लोकांनो, समजून घ्या; मूर्खांनो, तुम्ही कधीपर्यंत शिकणार आहात?

आळशीपणा आपणाला गाढ झोपेत टाकतो, पण ज्याला काम करण्याची इच्छा नाही तो उपाशी जातो.

दार जसे बिजागरीवर फिरते, तसा आळशी मनुष्य अंथरुणावर लोळत असतो.

हे यरूशलेमे, तू तारली जावी, म्हणून तू आपल्या हृदयातील पाप धुऊन काढ. “पाप कसे करावे” हे तुझ्या मनातील खोल विचार किती काळ राहतील?

¶ आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.

कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो.