TSK

TSK · स्तोत्र 21:6

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

तू जेथे जेथे गेलास तेथे तेथे मी तुला साथ दिली. तुझ्या शत्रूंचा तुझ्यासाठी पाडाव केला. पृथ्वीवरील इतर महान लोकांप्रमाणे मी तुला सुप्रसिद्ध करीन.

बरेच असे म्हणतात, “आम्हांला चांगुलपणा कोण दाखवेल? परमेश्वरा, आम्हांवर तुझा मुखप्रकाश पाड.”

तेव्हा मी देवाच्या वेदीजवळ, देव जो माझा मोठा आनंद आहे, त्याकडे जाईल, आणि हे देवा, माझ्या देवा, वीणा वाजवून मी तुझी स्तुती करीन.

म्हणून मी तुझे सामर्थ्य आणि गौरव पाहण्यासाठी मी आपली दृष्टी पवित्र मंदिराकडे लावली आहे.

देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो.

जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत; ते आपल्या समक्षतेने मला हर्षभरीत करशील.’”

तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.

¶ आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.