TSK

TSK · रोम 10:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

जेव्हा कोणीएक पाठलाग करत नसले तरी दुर्जन दूर पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.

तो पुष्कळ राष्ट्रांस शिंपडील, त्याच्याकडे पाहून राजे आपली तोंडे बंद करतील, कारण जे त्यांना सांगितले नव्हते ते पाहतील, आणि जे त्यांनी ऐकले नव्हते ते समजतील.”

¶ गळा काढून रड, दम धरू नको, रणशिंगाप्रमाणे तुझा आवाज मोठा कर. माझ्या लोकांनी केलेल्या चुका त्यांना सांग आणि याकोबाच्या घराण्यास त्यांची पापे दाखव.

‹म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”›

‹मालक नोकराला म्हणाला, ‘रस्त्यावर जा, कुंपणाजवळ जा आणि तेथे असलेल्या लोकांस आग्रहाने आत येण्यास सांग म्हणजे माझे घर भरून जाईल.›

आणि माझ्यासाठी प्रार्थना करा, जेव्हा मी तोंड उघडीन तेव्हा मला धैर्याने सुवार्तेचे रहस्य कळवण्यास शब्द मिळावे,