TSK

TSK · रोम 12:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

नाशापूर्वी गर्व येतो, आणि मनाचा ताठा अधःपाताचे मूळ आहे.

आपल्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो असा कोणी तुझ्या पाहण्यात आहे का? त्यापेक्षा मूर्खाला अधिक आशा आहे.

हे मनुष्या, चांगले ते त्याने तुला सांगितले आहे. आणि न्यायीपणाने वागने, दया व निष्ठा ह्यावर प्रेम करणे आणि आपल्या परमेश्वरासोबत नम्रपणे चालने. यांखेरीज परमेश्वर तुझ्याजवळ काय मागतो?

‹परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, अन्यायी, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही.›

त्याच्याद्वारे आम्हास कृपा व प्रेषितपण ही मिळाली आहेत, ह्यासाठी की सर्व राष्ट्रांत त्याच्या नावाकरता विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.

¶ बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.

एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.

¶ देवाच्या कृपेद्वारे जे मला दिले आहे त्याप्रमाणे मी सूज्ञ, कुशल बांधणाऱ्यांप्रमाणे पाया घातला आणि दुसरा त्यावर बांधीत आहे तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत, ह्याविषयी प्रत्येकाने काळजी घ्यावी.

तर जसे प्रभूने प्रत्येकाला वाटून दिले आहे, जसे देवाने प्रत्येकाला बोलावले आहे, तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे, मी सर्व मंडळ्यांना आज्ञा देत आहे.

पण देवाच्या कृपेने मी जो आहे तो मी आहे आणि त्याची माझ्यावरची कृपा व्यर्थ गेली नाही, उलट त्या सर्वांपेक्षा अधिक कष्ट मी केले आहेत, करणारा मी नाही, तर देवाची कृपा जी माझ्याबरोबर होती, ती करीत होती.

कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही, या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसर्‍या कोणत्या गोष्टीत दुसर्‍या मंडळ्यांपेक्षा कमी आहात? मला या अपराधाची क्षमा करा.

कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.

जेव्हा तुम्ही ती वाचाल तेव्हा ख्रिस्ताच्या खऱ्या रहस्याविषयीचे माझे ज्ञान तुम्हास समजेल,

¶ ख्रिस्ताने दिलेल्या दानाच्या मोजमापाप्रमाणे आपणा प्रत्येकाला दान मिळाले आहे.

¶ आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे.

आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;

त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे.

त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.

¶ आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर.

पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.”

¶ पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;

तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.

¶ मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.