TSK

TSK · रोम 8:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

मोशेने परमेश्वराची आज्ञा पाळली त्याने पितळेचा साप बनवला व तो खांबावर ठेवला. नंतर जेव्हा जेव्हा एखाद्या साप चावलेल्या मनुष्याने त्या खांबावरच्या पितळेच्या सापाकडे पाहिले तेव्हा तो जिवंत राहिला.

¶ शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.

¶ तेव्हा जो मनुष्य आंधळा होता त्यास त्यांनी दुसर्‍यांदा बोलावले आणि ते त्यास म्हणाले, “देवाचे गौरव कर; हा मनुष्य पापी आहे हे आम्ही जाणतो.”

कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.

कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.

कारण दैहिक दृष्ट्या जे माझे नातेवाईक आहेत त्या माझ्या बांधवांकरता मी स्वतः ख्रिस्ताकडून शापित व्हावे असे मी इच्छीन.

आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे.

पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,

¶ म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.

कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला.

¶ अशाप्रकारे, पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांची नियमशास्त्रात छाया आहे. त्या सत्याचे ते खरे स्वरूप नाही, म्हणून ते प्रतिवर्षी नित्य अर्पील्या जाणाऱ्या त्याच त्याच यज्ञांनी जवळ येणाऱ्यांना पूर्ण करण्यास केव्हाही समर्थ नाही.

कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.

¶ म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.