TSK

TSK · रूथ 1:20

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

Back to passage

“त्या अधिकाऱ्यापुढे तुम्ही जाऊन उभे रहाल तेव्हा सर्वसमर्थ देव तुम्हास साहाय्य करो. यासाठी की, त्याने बन्यामिनाला व शिमोनाला सोडून द्यावे. आणि जर मी माझ्या मुलांना मुकलो, तर मुकलो.”

तीन दिवस प्रवास केल्यानांतर ते लोक मारा नावाच्या ठिकाणी पोहोचले; तेथे पाणी फार कडू असल्यामुळे लोकांस ते पिववेना, म्हणूनच त्या ठिकाणाचे नाव मारा पडले.

त्या सर्वशक्तिमानाचे बाण माझ्यात आहेत. माझ्या प्राण विषाला पिऊन घेत आहे, देवाने स्वतः त्याची दहशत माझ्या विरुध्द सज्ज केली आहे

तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.

कारण दिवसभर मी पीडला जातो आणि प्रत्येक सकाळी शिक्षा होते.

मी सकाळपर्यंत रडत राहिलो; सिंहाप्रमाणे तो माझी सर्व हाडे मोडतो; दिवसाच्या व रात्रीच्यामध्ये तू माझ्या जीवनाचा शेवट करशील.

कोणतीही शिक्षा तर सध्या आनंदाची वाटत नाही, तर दुःखाची वाटते तरी तिचा अनुभव ज्यांना मिळाला आहे, त्यांना ती पुढे नीतिमत्त्व हे शांतीकारक फळ देते.

¶ आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत.