TSK

TSK · 1 इति 15:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

लेवीच्या वंशाला आण आणि त्यांना अहरोन याजकासमोर त्यास मदत करण्यास हजर कर.

लेवी लोकांपैकी कहाथी कुळांच्या पुरुषांची त्यांच्या वाडवडिलांच्या घराण्याप्रमाणे गणती कर. (हे लोक लेवीच्या कुळापैकीच होते)

जेव्हा ते परमपवित्रस्थानातील वस्तूजवळ जातील तेव्हा त्यांनी मरू नये पण जगावे म्हणून अहरोन व त्याचे पुत्र ह्यांनी आत जाऊन त्यांच्यातील एकएकाला त्यांचे काम व ओझे नेमून द्यावे.

लेवींना अहरोन व त्याचे पुत्र ह्यांच्या समोर सादर कर आणि माझ्यासाठी त्यांना अर्पणाप्रमाणे उंच करावे.

¶ परमेश्वर अहरोनास म्हणाला, या पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबरच्या तुझ्या घराण्यास वाहावा लागेल. त्याच प्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहवा लागेल.

¶ नंतर मोशेने सर्व नियमशास्त्र लिहून याजकांना दिले. हे याजक लेवी वंशातील होते. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहण्याचे काम त्यांचे होते. इस्राएलाच्या वडिलधाऱ्या लोकांसही मोशेने हे नियमशास्त्र दिले.

नंतर नूनाचा पुत्र यहोशवा याने याजकांना बोलावले आणि त्यांना म्हटले, “कराराचा कोश उचलून घ्या आणि सात याजकांनी सात एडक्याच्या शिंगाचे कर्णे घेऊन परमेश्वराच्या कोशापुढे चालत जावे.”

“ह्यातीलच काही लोकांस मी याजक व लेवी होण्यासाठी निवडीन.” परमेश्वर असे म्हणतो.