TSK

TSK · 1 इति 4:10

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

मी तुझे मोठे राष्ट्र करीन आणि मी तुला आशीर्वाद देईन आणि मी तुझे नाव मोठे करीन आणि तू आशीर्वादित होशील,

मग याकोबाने शपथ वाहून नवस केला, तो म्हणाला, “जर देव माझ्याबरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यामध्ये माझे रक्षण करील, आणि मला खावयास अन्न व घालण्यास वस्त्र देईल,

मग तो पुरुष याकोबाला म्हणाला, “आता मला जाऊ दे.” परंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही.”

तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नाव इस्राएल असेल. कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून विजय मिळवला आहेस.”

तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.”

¶ मनश्शेच्या लोकांनी बेथ-शान व त्याची खेडी, तानख व त्याची खेडी, दोर व त्याच्या खेड्यात राहणाऱ्यांना, इब्लाम व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना आणि मगिद्दो व त्याची खेडी यामध्ये राहणाऱ्यांना बाहेर घालवून दिले नाही. कारण त्या कनान्यांनी त्या प्रदेशात राहण्याचा निश्चय केला.

नेमलेली वेळ आल्यावर हन्ना गरोदर राहिली व तिने मुलाला जन्म दिला आणि तिने त्याचे नाव शमुवेल असे ठेवले; ती म्हणाली कारण मी त्यास परमेश्वरापासून मागून घेतले.

या मुलासाठी मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मी परमेश्वरापाशी मागितली होती ती त्याने मला दिली आहे.

परमेश्वराचे स्तवन करा. त्याच्या नावाने हाक मारा. राष्ट्रांस त्याची कृत्ये कळवा.

तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि तू आपले नवस फेडशील.

मी गप्प राहिलो, तेव्हा पूर्ण दिवस माझ्या, ओरडण्याने माझी हाडे जर्जर झाली.

तू केलेल्या तारणाचा आनंद मला पुन्हा होऊ दे, आणि उत्सुक आत्म्याने मला सावरून धर.

जो तू प्रार्थना ऐकतोस, त्या तुझ्याकडे सर्व मानवजाती येते.

राजाचे नाव सर्वकाळ टिकून राहो; सूर्य आहे तोपर्यंत त्याचे नाव पुढे चालू राहो; त्याच्यात लोक आशीर्वादित होतील; सर्व राष्ट्रे त्यास धन्य म्हणतील.

मी परमेश्वरावर प्रेम करतो कारण तो माझी वाणी आणि माझ्या विनंत्या दयेसाठी ऐकतो.

परमेश्वर सर्व वाईटापासून तुझे रक्षण करील; तो तुझ्या जिवाचे रक्षण करील.

परमेश्वराचे आशीर्वाद चांगली संपत्ती आणते, आणि त्यामध्ये तो अधिक दुःख देत नाही.

¶ भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.

मला हाक मार आणि मी तुला उत्तर देईन. ज्या तुला समजत नाही अशा महान, गहन गोष्टी मी तुला दाखवीन.

¶ ‹मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल.›

‹“कोणत्या गोष्टी तुला शांती देतील ते जर आज तू जाणून घेतले असते तर! परंतु आता त्या तुझ्या नजरेपासून लपवून ठेवण्यात आल्या आहेत.›

तो तिसर्‍यांदा त्यास म्हणाला, ‹“योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?”› पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, ‹“माझी मेंढरे चार.”›

यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे,

कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाईटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.

¶ कारण मी स्वतःशी ठरवले होते की, मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये.

¶ आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आमची मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,

प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.