¶ योहानानाचा, पुत्र अजऱ्या, शलमोनाने यरूशलेमामध्ये मंदिर बांधले तेव्हा हा अजऱ्याच याजक होता.
TSK
TSK · 1 इति 6:32
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ मग दावीदाने काही लेवींची परमेश्वराच्या कोशापुढे सेवा करण्यास आणि इस्राएलाचा देव परमेश्वर याचे गुणगान गाणे, त्याचे आभार मानणे, स्तुती करणे हे त्यांचे काम नेमून दिले.
ते आणि त्यांचे नातेवाईक गायनकलेत पारंगत व परमेश्वरासाठी गायनाचे प्रशिक्षण घेतलेले दोनशे अठ्याऐशींजण होते.
लेव्याची आणि याजकांची अनेक गटामध्ये विभागणी केलेली होती. त्यापैकी प्रत्येक गटाला आपआपले विशेष कामकाज नेमून दिलेले होते. राजा हिज्कीयाने त्या सर्वांना आपला कारभार हाती घ्यायला सांगितले. होमार्पणे व शांत्यर्पणे वाहणे हे लेवीचे व याजकांचे नेमलेले काम होते. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे म्हणणे व परमेश्वराच्या मंदिरात सेवा करणे हे ही त्यांचे काम होते.
जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोषाख घालून हाती कर्णे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले.
¶ मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदूथूनाचा
याजक आणि लेवी यांनी देवासाठी करायची ती सर्व कृत्ये केली. लोकांच्या शुद्धीकरणाचे विधी पार पाडले. दावीद आणि शलमोन यांच्या आज्ञेवरून गायक व द्वारपाल यांनी आपली कामगिरी बजावली.
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो या, जे तुम्ही रात्रभर परमेश्वराच्या मंदिरात उभे राहता ते तुम्ही परमेश्वरास धन्यवाद द्या.