TSK

TSK · 1 इति 6:53

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

अहीटूबाचा मुलगा सादोक आणि अब्याथारचा मुलगा अहीमलेख हे याजक होते. सराया कार्यवाह होता.

सादोक आणि अब्याथार हे याजक तुझ्याबरोबर असतील. राजाच्या घरी जे ऐकशील ते सगळे त्यांच्या कानावर घालत जा.

शबा चिटणीस होता. सादोक आणि अब्याथार हे याजक होते.

पण मी, सादोक याजक यहोयादाचा पुत्र बनाया आणि तुमचा सेवक शलमोन यांना मात्र त्याने बोलावलेले नाही.

यवाबाच्या जागी राजा शलमोनाने यहोयादाचा पुत्र बनायाची सेनापती म्हणून नेमणूक केली आणि अब्याथाराच्या जागी मुख्य याजक म्हणून सादोकाची केली.

अहीटूबचा पुत्र सादोक. सादोकाचा पुत्र अहीमास.

शबुएल हा गेर्षोमचा थोरला पुत्र.

राजा दावीद, सादोक, अहीमलेख आणि याजक व लेवी घराण्यातील प्रमुख यांच्यासमोर त्यांनी चिठ्ठ्या टाकल्या. घराण्यातील श्रेष्ठ मुलाने कनिष्ठाबरोबर चिठ्ठ्या टाकल्या. त्यांनी अहरोन याच्या वंशजाप्रमाणेच चिठ्ठ्या टाकल्या.