ओबद्या शमाया याचा पुत्र. शमाया गालालचा पुत्र. गालाल यदूथूनचा पुत्र. याखेरीज आसा याचा पुत्र बरेख्या हाही तेथे राहत होता. आसा एलकानाचा पुत्र. हा नटोफाथी लोकांच्या जवळच्या छोट्या गावांमध्ये राहत होता.
TSK
TSK · 1 इति 9:22
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
लेव्यातला एक मत्तिथ्या, जो शल्लूम कोरही याचा थोरला पुत्र होता. अर्पणाच्या भाकरी तयार करण्याऱ्यांचा प्रमुख होता.
¶ दावीद आणि निवासमंडपाच्या अधिकाऱ्यांनी मिळून आसाफाच्या मुलांना एका खास कामासाठी निवडले. हेमान व यदूथून ही ती अपत्ये. वीणा, सतारी आणि झांजा ही वाद्ये, वाजवून देवाचा संदेश देणे असे त्यांच्या कामाचे स्वरूप होते. हे काम करणाऱ्या लोकांची यादी:
¶ याजक आणि लेवी यांच्या गटांची माहिती व परमेश्वराच्या मंदिराच्या सेवेच्या सर्व कामाची आणि परमेश्वराच्या मंदिरातील सर्व उपयोगात येणारी उपकरणे याबद्दलची जबाबदारी त्यांना नेमून दिली.
¶ राजा दावीदाचा इतिहास पहिल्यापासून शेवटपर्यंत संदेष्टा शमुवेल याच्या ग्रंथात आणि संदेष्टा नाथानाच्या ग्रंथात तसेच गाद या संदेष्ट्याच्या ग्रंथात लिहिलेला आहे.
ज्या लेवीची वंशावळ्यांमध्ये नोंद झालेली होती त्या सर्वांच्या अपत्यांना, पत्नींना पुत्र व कन्या यांनाही आपापला हिस्सा मिळे. परमेश्वराच्या सेवेसाठी ते नेहमीच पवित्र होऊन तप्तर असत म्हणून त्यांना हे दिले जाई.
लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.
¶ त्यादिवशी भांडार, अर्पणे, प्रथमफळे दशांश यांच्या कोठारांवर अर्पणे गोळा करण्यासाठी लोकांच्या नेमणुका केल्या. त्या अर्पणातील काही भाग याजक व लेवी यांच्यासाठी नियमशास्त्राप्रमाणे होता. समोर उभ्या असलेल्या याजक व लेवी यांच्यासाठी यहूदातील लोकांनी आनंद केला.