¶ लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरून जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
TSK
TSK · 1 योहा 2:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
येशूने उत्तर दिले, ‹“‘प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर.’›
नंतर त्यांनी त्यास धरून अरियपग टेकडीवर नेऊन म्हटले, “तुम्ही दिलेली ही नवी शिकवण काय हे आम्हास समजून सांगाल काय? कारण तुम्ही आम्हास अपरिचित गोष्टी ऐकवत आहा; ह्याचा अर्थ काय हे समजून घ्यावे अशी आमची इच्छा आहे.
¶ कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा.
तुमच्याविषयी जे म्हणावयाचे तर, जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते तुम्हामध्ये राहो. जे तुम्ही आरंभापासून ऐकले ते जर तुम्हामध्ये राहिले, तर तुम्हीही पुत्रामध्ये व पित्यामध्ये रहाल.
¶ तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.