‹माझ्या नावामुळे सर्व तुमचा द्वेष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.›
TSK
TSK · 1 योहा 3:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
‹आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.›
‹माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील.›
‹जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.›
‹ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे.›
‹मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.›
कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.
हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.