देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय?
TSK
TSK · 1 योहा 5:10
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
परमेश्वराचे सत्य त्याचे अनुकरण करणाऱ्यांबरोबर असते. आणि तो त्याचे करार कळवतो.
¶ आम्ही जे ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे? आणि परमेश्वराचा भुज कोणास प्रगट झाला आहे?
¶ ‹कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.›
‹त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही?›
तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत.
कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे.
शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
¶ येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो.
¶ ‹जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मीसुद्धा त्यास देईल. मी त्यास पहाटेचा तारा देईन.›