TSK

TSK · 1 राजे 21:19

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परमेश्वर त्यास म्हणाला, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस अशी मी तुला आज्ञा दिली होती त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

तेव्हा अदोनी-बेजेक म्हणाला, “हातांचे व पायांचे अंगठे कापून टाकलेले सत्तर राजे माझ्या मेजाखाली अन्न वेचीत होते; जसे मी केले तसे देवाने माझे केले आहे.” त्यांनी त्यास यरूशलेमेस आणले; तेथे तो मेला.

परमेश्वर म्हणतो, आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या स्त्रिया तुझ्यापासून मी हिरावून घेऊन. त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायकां बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल.

राजाने अलीशाकडे एक दूत पाठवला. अलीशा आपल्या घरात बसला होता आणि गावातील वडिलधारी मंडळी त्याच्या बैठकीत होती. हा दूत तेथे पोचण्यापूर्वी अलीशा त्या लोकांस म्हणाला, “हे बघा, तो इस्राएलचा घातकी राजा माझा शिरच्छेद करण्यासाठी माणसे पाठवत आहे. तेव्हा आता दूत येईल तेव्हा त्यास लोटून दार लावून घ्या. त्याच्या मागोमाग त्याच्या स्वामीच्या पावलांची चाहुल मला लागली आहे!”

या अधिकाऱ्यांना हे पत्र मिळाले तेव्हा त्यांनी या राजाच्या सर्व सत्तर राजपुत्रांना एकत्र आणून ठार केले. मग त्यांची मस्तके टोपल्यांमध्ये भरली. या टोपल्या येहूकडे इज्रेल याठिकाणी पाठवल्या.

तेव्हा मर्दखयासाठी उभारलेल्या खांबावर हामानाला फाशी देण्यात आली. मग राजाचा क्रोध शमला.

त्याच्या अपायकारक योजना त्याच्याच डोक्यावर परत येतील, आणि त्याची हिंसा त्याच्याच माथ्यावर येईल.

परमेश्वराने त्या वाईट लोकांस पकडले. परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्यांना शिक्षा करतो हे ते शिकले हिग्गायोन.

¶ म्हणून यिर्मया संदेष्ट्याने परमेश्वराची ही सर्व वचने यरूशलेमेमध्ये सिद्कीया राजाला सांगितली.

‘जो आपल्या घराण्यासाठी वाईट लाभ मिळवतो व त्याद्वारे अरीष्टांच्या हातातून सुटावे म्हणून आपले घरटे उंच स्थापितो, त्यास हाय हाय!’

‹कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल.›