तुम्ही मराल तेथे मी मरेन व तिथेच मला पुरले जाईल. मरणाशिवाय कशानेही तुमचा माझा वियोग झाला तर परमेश्वर मला शिक्षा करो किंवा त्यापेक्षा अधिक करो.”
TSK
TSK · 1 शमु 20:13
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आता, जेव्हा ही सर्व चिन्हे तुला प्राप्त होतील, तेव्हा असे होवो की, तुला प्रसंग मिळेल तसे तू कर, कारण परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
शौलाने तर इस्राएलावर राज्य करण्याचे हाती घेतले; त्याने चहूकडे आपल्या सर्व शत्रूशी म्हणजे मवाबी यांच्याशी व अम्मोनाच्या संतानाशी व अदोमी यांच्याशी व सोबाच्या राजांशी व पलिष्ट्यांशी लढाई केली आणि जेथे कोठे तो गेला तेथे त्याने त्यांना त्रासून सोडले.
मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.
दावीदाने काही तरी खाऊन घ्यावे म्हणून दिवसभर लोकांनी त्याची मनधरणी केली. पण दावीदाने एक निर्धार केला होता. सूर्यास्तापूर्वी मी भाकर किंवा तत्सम काहीही खाल्ले तरी देव मला शासन करो, मला संकटात टाको असे तो बोलला होता.
आणि अमासास सांगा, तुम्ही माझ्या कुटुंबाचाच भाग आहात. यवाबाच्या जागी सेनापती म्हणून मी तुमची नेमणूक केली नाही, तर देव मला शासन करो.
तेव्हा बेन-हदादकडून अहाबाला दुसरा निरोप आला. त्या निरोपात म्हटले होते, “शोमरोनचा मी पूर्ण विध्वंस करीन. तिथे काहीही शिल्लक उरणार नाही. आठवणी दाखल काही घेऊन यावे असेही माझ्या मनुष्यांना काही राहणार नाही. असे झाले नाहीतर देव माझे तसे करो व त्यापेक्षा अधिक करो.”
जे कोणी सोने, रुपे, पितळ, लोखंड यावर काम करू शकतात, अशी असंख्य माणसे तुझ्याबरोबर आहेत. तेव्हा आता कामाला सुरवात कर. परमेश्वर तुझ्याबरोबर आहे.”
माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील.