TSK

TSK · 2 इति 11:16

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वंशातून एक स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.

आपले होमबली वाटेल त्याठिकाणी अर्पण करु नका त्याविषयी सावध असा.

आणि जर तुमच्या वतनाचा देश अशुद्ध असला, तर परमेश्वर वतनाच्या देशात, जेथे परमेश्वराचा निवासमंडप राहत आहे तेथे उतरून या, आणि आमच्यामध्ये वतन करून घ्या, परंतु आमचा देव परमेश्वर याच्या वेदी व्यतिरिक्त तुमच्यासाठी दुसरी वेदी बांधून आमचा देव परमेश्वर याच्याविरुद्ध आणि आमच्याविरुद्ध ही बंड करू नका.

परमेश्वरास त्याच्या नावाचे योग्य ते गौरव द्या. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. पावित्र्यानेयुक्त होऊन परमेश्वराची आराधना करा.

तेव्हा आता अंत:करणपूर्वक तुम्ही परमेश्वर तुमचा देव याचा शोध करा. उठा व परमेश्वर देवाचे पवित्र मंदिर बांधा. कारण परमेश्वराच्या नावासाठी जे मंदिर बांधायचे आहे त्यामध्ये मग परमेश्वराच्या कराराचा कोश आणि देवाची इतर पवित्र वस्तू आणून ठेवा.”

तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.

पण तू काही चांगल्या गोष्टीही केल्या आहेस. या देशातून तू अशेराचे खांब हटवलेस आणि परमेश्वरास अनुसरायचे तू मन:पूर्वक ठरवले आहेस.

तेव्हा यहूदातून, यहूदाच्या सर्व नगरांमधून लोक यहूदाच्या साहाय्याची परमेश्वराकडे याचना करायला जमले.

एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.

दडपशाहीवर आणि चोरीवर भरवसा ठेवू नका; आणि संपत्तित निरुपयोगी आशा ठेवू नका;

हे देवा, माझे मन स्थिर आहे; मी आदराने माझ्या मनापासून संगिताने गाणे गाईन.

ते माझ्या लोकांच्या पापावर जगतात. त्यांच्या दुष्टतेकडे त्याचे मन लागलेले आहे.

निरनिराळ्या नगरातील लोक एकमेकांना भेटतील व म्हणतील, ‘आम्ही सेनाधीश परमेश्वराची कृपा मिळवू व त्यास शोधू.’ मीही येतो.”