परात्पर देव ज्याने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले तो धन्यवादित असो.” तेव्हा अब्रामाने त्यास सर्वाचा दहावा भाग दिला.
TSK
TSK · 2 इति 13:16
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
आमचा देव परमेश्वर ह्याने बाशानाचा राजा ओग आणि त्याची प्रजा आमच्या हाती दिली. आम्ही त्यास असा मार दिला की त्यांच्यापैकी कोणीही जिवंत राहिले नाही.
याप्रकारे परमेश्वराने त्यांच्या पूर्वजांजवळ जशी शपथ वाहिली होती, तसा त्याप्रमाणेच त्यास चहूंकडून विसावा दिला, त्याच्या सर्व शत्रूंतला कोणी त्यांच्यापुढे टिकला नाही; परमेश्वराने त्यांचे सर्व शत्रू त्यांच्या हाती दिले.
तेव्हा इस्राएलाचा देव परमेश्वर याने सीहोन व त्याचे सर्व लोक इस्राएलाच्या हाती दिले; यास्तव इस्राएलानी त्यांचा नाश केला, आणि त्या देशात राहिलेले जे अमोरी त्यांचा सर्व देश वतन करून घेतला.
कूशी आणि लुबी यांचे सैन्य तर केवढे बलाढ्य होते! त्यांच्याकडे कितीतरी रथ आणि स्वार होते पण तेव्हा तू परमेश्वरावर भरवंसा ठेवलास आणि परमेश्वराने तुला विजय मिळवून दिला.