TSK

TSK · 2 इति 14:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुम्ही तेथील वेद्या मोडून टाका, दगडी स्मारकस्तंभांचा विध्वंस करा. अशेरा मूर्ती जाळा, त्यांच्या दैवतांच्या कोरीव मूर्तीची मोडतोड करा. म्हणजे त्याठिकाणी त्यांची नावनिशाणीही उरणार नाही.

त्याने उच्च स्थानाची नासधूस केली नाही, मात्र आसा आयुष्यभर परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला.

आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.

राजा हिज्कीयाने अशाप्रकारे यहूदात चांगली कामगिरी केली. परमेश्वर देवाच्या दृष्टीने जे योग्य, बरोबर आणि सत्य ते त्याने केले.

माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.