मी त्यास यासाठी निवडले आहे की, त्याने आपल्या मुलांना व कुटुंबाला अशी शिकवण द्यावी की, त्यांनी त्याच्यामागे न्यायीपणाने व धार्मिकतेने परमेश्वराचा मार्ग अनुसरावा, म्हणजे मग परमेश्वराने अब्राहामाविषयी जे सांगितले आहे ते तो त्यास प्राप्त करून द्यावे.”
TSK
TSK · 2 इति 14:4
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
कारण मी त्यास सांगितले की जो अन्याय त्यास माहित आहे, त्यामुळे मी त्याच्या घराण्याला निरंतर न्यायदंड करीन कारण त्याच्या मुलांनी आपणावर शाप आणला तरी त्याने त्यांना आवरले नाही.
त्यांनी सात बैल, सात मेंढे, सात कोकरे आणि सात बोकड पापार्पणासाठी आणले. यहूदाचे राज्य, परमेश्वराचे पवित्रस्थान आणि यहूदा यांच्या शुद्धीप्रीत्यर्थ हे प्राणी होते. अहरोनाचे वंशज असलेल्या याजकांना हिज्कीयाने ते प्राणी परमेश्वराच्या वेदीवर अर्पण करायची आज्ञा केली.
हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यांनी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदीत झाले. सर्वांनी लवून नमस्कार करून देवाची आराधना केली.
तो म्हणाला, “परमेश्वर देवा, तू भला आहेस. तुझी आराधना योग्य तऱ्हेने व्हावी असे या लोकांस मनापासून वाटते. पण धर्मशास्त्राप्रमाणे त्यांनी शुद्धीकरण केलेले नाही. त्यांना क्षमा कर. आमच्या पूर्वजांपासूनचा तूच आमचा देव आहेस. अत्यंत पवित्रस्थानाच्या नियमाप्रमाणे त्यांच्यापैकी कोणी पवित्र झालेले नसले तरी तू त्यांना क्षमा कर.”
मग त्याने यरूशलेम आणि बन्यामीन मधील लोकांसही या करारपालनात सामील करून घेतले. यरूशलेमचे लोक आपल्या पूर्वजांच्या देवाचा करार पाळू लागले.
त्याचबरोबर त्यांच्या सर्व स्त्रिया, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व पुत्र आणि कन्या. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तीसमवेत परमेश्वर देवाचे जे नियमशास्त्र देवाचा सेवक मोशे याच्याकडून दिले होते ते पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासंबंधीचा शापही त्यांनी स्विकारला.
¶ प्रत्येक शब्बाथ दिवसापूर्वी रात्री अंधार पडल्यानंतर यरूशलेमेच्या वेशी कडेकोट बंद कराव्यात आणि शब्बाथ दिवस होऊन गेल्याखेरीज त्यांचे दरवाजे उघडायचे नाहीत असा आदेश दिला. माझे काही चाकर मी वेशीवर उभे केले ते यासाठी की, शब्बाथ दिवशी कोणताही माल यरूशलेमेमध्ये येणार नाही.
मी आपल्या मनापासून तुझा शोध केला आहे; तुझ्या आज्ञांपासून मला बहकू देऊ नकोस.
परमेश्वर इस्राएलाच्या घराण्याला असे म्हणतो, “मला शोधा म्हणजे तुम्ही जिवंत रहाल.”