¶ या गोष्टी घडल्यानंतर अब्रामाला दृष्टांतात परमेश्वराचे वचन आले. तो म्हणाला, “अब्रामा, भिऊ नको. मी तुझे संरक्षण करीन आणि तुला फार मोठे प्रतिफळ देईन.”
TSK
TSK · 2 इति 15:7
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
मात्र तू बलवान हो व धैर्य धर, आणि माझा सेवक मोशे याने तुला दिलेले नियमशास्त्र सगळे काळजीपूर्वक पाळ, ते सोडून उजवीडावीकडे वळू नको, म्हणजे तू जाशील तिकडे यशस्वी होशील.
यास्तव कनिज्जी यफुन्नेचा पुत्र कालेब याचे हेब्रोन वतन आजपर्यंत चालत आहे; कारण की तो इस्राएलाचा देव परमेश्वर याला पूर्ण अनुसरला.
¶ दावीद शलमोनाला पुढे म्हणाला “बलवान हो आणि धैर्य धर. काम कर. कारण परमेश्वर देव म्हणजे माझा देव तुझ्यासोबत आहे, तेव्हा घाबरु नको. परमेश्वराच्या घराचे सर्व काम पुरे़ होईपर्यंत तो तुला सोडणार नाही व टाकणार नाही.
हिज्कीया त्यांना म्हणाला, “हिंमत बाळगा आणि द्दढ राहा. अश्शूरच्या राजाची किंवा त्याच्या विशाल सेनेची धास्ती घेऊ नका. आपली ताकद त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
परमेश्वराची वाट पाहा; मजबूत हो आणि तुझे हृदय धैर्यवान असो. परमेश्वराची वाट पाहा.
दुर्बल हातांना बळकट करा आणि थरथर कापणारे गुडघे घट्ट करा.
तो म्हणाला, “हे परमप्रिय मानवा घाबरू नकोस, तुला शांती असो हिंमत धर. आता, नेट धर!” तो जेव्हा हे बोलला तेव्हा मला बळ मिळाले आहे व मी म्हणालो, “माझ्या स्वामीने आता बोलावे, कारण तू मला सबळ केले आहे.”
‹आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे, कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.›
¶ ‹लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही.›
‹पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल.›
‹जो कोणी संदेष्ट्यांचा स्वीकार त्याच्या संदेशाच्या सेवेमुळे करतो, त्यास संदेष्ट्याचे प्रतिफळ मिळेल आणि नीतिमानाला नीतिमान म्हणून जो स्वीकारतो त्यास नीतिमानाचे प्रतिफळ मिळेल.›
आता जो कोणी काम करतो त्याचे वेतन कृपा म्हणून गणले जात नाही, पण देणे म्हणून गणले जाते.
ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल.
म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यासाठी वाहून घ्या कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
¶ शेवटी, प्रभूमध्ये बलवान होत जा आणि त्याच्या सामर्थ्याने सशक्त व्हा.
कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.