TSK

TSK · 2 इति 17:3

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

परंतु परमेश्वर देव योसेफाबरोबर होता, आणि त्याने त्यास कराराची सत्यता दाखवली. त्याने तुरुंगाच्या अधिकाऱ्याची त्याच्यावर कृपादृष्टी होईल असे केले.

तेव्हा मी सांगतो, तू आता जा. मी तुझ्या मुखाला साहाय्य होईन व तू काय बोलावे हे मी तुला शिकवीन.”

मी तुला आज्ञा केली नाही का? बलवान हो, धीट हो, घाबरू नकोस, धैर्यहीन होऊ नकोस, कारण तू जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.”

परमेश्वर जेव्हा त्यांच्यासाठी न्यायाधीश उभे करी तेव्हा त्या न्यायाधीशाबरोबर परमेश्वर असे आणि त्या न्यायाधीशाच्या सर्व दिवसात तो त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हातून बचावीत असे; कारण त्यांच्यावर जुलूम करणारे व त्यांना गांजणारे यांच्यामुळे ते कण्हत असत; म्हणून देवाला त्यांची दया येई.

तेव्हा असे झाले की, गिदोन मरण पावल्यावर इस्राएलाच्या लोकांनी फिरून बाल देवामागे लागून व्यभिचार केला, आणि बआल-बरीथ ह्याला आपला देव केले.

मग शौल दावीदाचे भय धरू लागला, कारण परमेश्वर शौलाला सोडून दावीदाच्या बरोबर होता.

सर्वशक्तिमान परमेश्वर त्याच्या बाजूचा होता म्हणून दावीद अधिकाधिक सामर्थ्यवान होत गेला.

¶ राजा शलमोनही आपले वडिल दावीद यांनी सांगितलेल्या नियमांचे मन:पूर्वक पालन करून परमेश्वरावरील आपले प्रेम प्रकट करीत असे. त्या गोष्टीखेरीज यज्ञ करायला आणि धूप जाळायला तो उंच ठिकाणी जात असे.

आपल्या वडिलांच्याच पापांची उजळणी याने केली. आपले आजोबा दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वर देवाशी एकनिष्ठ नव्हता.

आहाज तेव्हा वीस वर्षांचा होता. त्याने यरूशलेमामध्ये सोळा वर्षे राज्य केले. परमेश्वराने जी कृत्ये वाईट म्हणून सांगितली ती त्याने केली. आपला पूर्वज दावीद याच्यासारखे तो परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करत नसे.

योशीयाचे वर्तन परमेश्वराच्या दृष्टीने नीट ते तो करीत असे. आपला पूर्वज दावीद याच्याप्रमाणे तो चालला. परमेश्वराच्या शिकवणुकी प्रमाणेच वागला. देवाला जसे पाहिजे तेच त्याने केले.

आसाने परमेश्वर देवाच्या दृष्टीने चांगले आणि उचित असा कारभार केला.

अजऱ्या आसाच्या भेटीला गेला आणि म्हणाला, “आसा मी काय म्हणतो ते ऐक. यहूदा आणि बन्यामीन लोकहो, तुम्हीही ऐका. जर तुम्ही परमेश्वराबरोबर राहिलात तर तो तुमच्याबरोबर राहील. जर तुम्ही त्याचा शोध केलात तर तो तुम्हास भेटेल. पण तुम्ही त्यास सोडलेत तर तो ही तुम्हास सोडेल.

आपले पिता आसा यांच्याप्रमाणेच यहोशाफाट योग्य मार्गाने वागला. त्याने मार्ग सोडला नाही. परमेश्वराच्या दृष्टीने भले तेच यहोशाफाटाने केले.

यानंतर येहूने अहज्याचा शोध घेतला. येहूच्या मनुष्यांनी त्यास तो शोमरोनात लपायच्या प्रयत्नात असताना पकडले. अहज्याला त्यांनी येहूसमोर हजर केले, नंतर त्यांनी त्यास ठार केले आणि त्याचे दफन केले. ते म्हणाले, “अहज्या हा यहोशाफाटाचा वारस. यहोशाफाट जिवाभावाने परमेश्वरास शरण गेला होता.” यहूदाचे राज्य सांभाळण्याइतके अहज्याचे घराणे समर्थ राहिले नव्हते.

¶ हिज्कीयाची वागणूक परमेश्वराच्या दृष्टीने उचित अशी होती. आपला पूर्वज दावीद याच्या प्रमाणेच त्याचे वर्तन सुयोग्य असे.

सेनाधीश परमेश्वर आमच्याबरोबर आहे. याकोबाचा देव आमचा आश्रयस्थान आहे.

हे परमेश्वरा, दावीदाकरता त्याच्या सर्व दुःखांची आठवण कर.

¶ भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे. चिंतातुर होऊ नकोस, कारण मी तुझा देव आहे. मी तुला शक्ती देईन, आणि मी तुला मदत करीन, मी आपल्या विजयाच्या उचित उजव्या हाताने तुला आधार देईन.

“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”

‹ज्याला पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या दिल्या होत्या त्याने त्याप्रमाणे काम करायला सुरूवात केली आणि आणखी पाच हजार सोन्याच्या नाण्याच्या थैल्या त्याने मिळविल्या.›

¶ प्रभू तुझ्या आत्म्यासोबत असो. देवाची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो.