TSK

TSK · 2 इति 20:8

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

¶ याप्रमाणे परमेश्वराने इस्राएलाला जो देश त्यांच्या पूर्वजांना देण्याची शपथ वाहिली होती तो अवघा दिला; आणि ते तो वतन करून घेऊन त्यामध्ये राहिले.

मी माझ्या लोकांस मिसरातून बाहेर आणल्यानंतर इस्राएल वंशातील कोणतेही नगर मी माझ्या नावाचे घर तिथे बांधले जावे म्हणून निवडले नाही. तसेच, माझ्या इस्राएल लोकांचे आधिपत्य करण्यासाठी कोणाएकाची निवडही केली नाही.

आता परमेश्वराने कबूल केले तसेच झाले आहे व माझे पिता दावीद यांच्या जागी मी इस्राएल लोकांचा राजा झालो आहे. ‘मी इस्राएलचा राजा आहे असे होईल’ हे वचन परमेश्वराने दिले होते, आणि मी इस्राएलाचा देव परमेश्वर याच्या नावाने मंदिर बांधले आहे.