TSK

TSK · 2 इति 21:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

यहोराम आपल्या पित्याच्या जागी गादीवर आला आणि सत्ताधीश बनला. त्याने आपल्या सर्व भावांचा तसेच इस्राएलमधील काही वडिलधाऱ्यांचा तलवारीने वध केला.

तेव्हा त्याने याजक आणि लेवी यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “यहूदामधील सर्व गावांमध्ये जा आणि इस्राएल लोकांकडून पैसे जमा करा. त्या पैशातून देवाच्या मंदिराच्या दुरुस्तीचे काम हाती घ्या.” या कामाला विलंब लावू नका पण लेवींनी याबाबतीत तप्तरता दाखवली नाही.

परमेश्वराने यहूदाला संकटानी जेरीला आणले कारण इस्राएलाचा राजा आहाज याने वाईट वर्तन केले होते. आहाजाने परमेश्वराविरूद्ध महापाप केले होते.

आहाज मरण पावला आणि त्याच्या पूर्वजांशेजारी त्याचे दफन झाले. यरूशलेम नगरात लोकांनी त्यास पुरले. पण इस्राएलच्या इतर राजांचे जेथे दफन झाले त्या जागी मात्र नव्हे. आहाजाचा पुत्र हिज्कीया हा पुढे राजा झाला.

शमुवेल संदेष्ट्यांच्या काळापासून हा सण एवढ्या मोठ्या प्रमाणात साजरा झाला नव्हता. इस्राएलच्या कुठल्याच राजाच्या कारकीर्दींत हे झाले नव्हते. राजा योशीया, याजक, लेवी, यहूदा आणि इस्राएलातून आलेले लोक आणि यरूशलेमची प्रजा यांनी वल्हांडणाचा उत्सव थाटामाटाने केला.