¶ परमेश्वर मोशेला म्हणाला, याजक म्हणून माझी सेवा करण्यासाठी तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र नादाब, अबीहू, एलाजार व इथामार यांना इस्राएल लोकांतून वेगळे होऊन तुजकडे येण्यास सांग.
TSK
TSK · 2 इति 26:18
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
¶ म्हणून याजक एलाजाराने लोकांनी आणलेली काशाची सर्व भांडी गोळा केली. ते सगळे लोक जळून गेले पण त्यांची भांडी मात्र होती. नंतर एलाजाराने काही मनुष्यांना भांडी ठोकून त्यांचा पत्रा करायला सांगितले. नंतर त्याने धातूचा पत्रा वेदीवर ठोकला व वेदी मढवली.
पण अहरोन फक्त तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फक्त तुम्हीच जाऊ शकता. पवित्रस्थानाच्या पडद्याआड फक्त तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्यास मारुन टाकले जाईल.
यामुळे इस्राएलांचा परमेश्वर म्हणतो, की तुझे घराणे व तुझ्या बापाचे घराणे माझ्यासमोर निरंतर चालेल असे मी म्हटले खरे; परंतु आता परमेश्वर असे म्हणतो, ही गोष्ट माझ्यापासून दूर होवो कारण जे माझा आदर करतात त्यांचा आदर मी करीन आणि जे मला तिरस्कार करतात त्यांचा अवमान होईल.
हनानीचा पुत्र येहू हा द्रष्टा होता तो राजा यहोशाफाटाला सामोरा गेला. येहू यहोशाफाटाला म्हणाला, “दुष्टांच्या मदतीला तू का गेलास? परमेश्वराचा द्वेष करणाऱ्यांबद्दल तुला आपुलकी का वाटावी? म्हणूनच परमेश्वराचा तुझ्यावर कोप झाला आहे.”
राजाला आणि राणीच्या आईला सांग, स्वत:ला नम्र करा आणि खाली बसा, कारण तुमचा मुकुट, म्हणजे तुमचे गौरव आणि गर्व, खाली पडले आहे.
‹माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांपुढे माझ्याविषयी सांगाल.›
कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.”
तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे.
¶ आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता.
¶ माझ्या बंधूंनो, गौरवशाली प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे तुम्ही पक्षपाताने वागू नका