या कारणामुळे, मीही त्यांच्याविरुद्ध होऊन, त्यांना त्यांच्या शत्रूंच्या देशात आणले असे ते कबूल करतील आणि त्यांचे अशुद्ध हृदय लीन होऊन ते आपल्या पापांबद्दलची शिक्षा मान्य करतील.
TSK
TSK · 2 इति 30:11
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
इस्राएलच्या सर्व वंशातील जे लोक इस्राएलचा देव परमेश्वर याच्याशी एकनिष्ठ होते ते ही, लेवींनी इस्राएल सोडल्यावर, त्यांच्या पुर्वजांचा देव परमेश्वरास यज्ञार्पणे करण्यासाठी यरूशलेमेला आले.
रहबाम असा नम्र झाल्यामुळे परमेश्वराचा त्याच्यावरील राग कमी झाला. त्याचा परमेश्वराने पूर्ण नायनाट केला नाही. शिवाय यहूदात थोडा चांगुलपणाही शिल्लक होता.
इस्राएलाच्या प्रजेने यरूशलेमामध्ये बेखमीर भाकरीचा सण सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन:पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्तोत्रे गाईली.
मनश्शेचे हाल झाले तेव्हा त्याने परमेश्वर देवाची करुणा भाकली. त्याच्या पूर्वजांच्या देवासमोर मनश्शे नम्र झाला.
पुढे त्याचे पिता मनश्शे जसे परमेश्वरास नम्रपणे शरण गेले तसा तो गेला नाही. उलट आमोनाची दुष्कृत्ये वाढतच चालली.
¶ हे बेलशस्सरा तू त्याचा पुत्र असून हे सर्व तुला माहीत असूनही तू आपले मन नम्र केले नाहीस.
‹मी तुम्हास सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरुन घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल.”›
परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.