TSK

TSK · 2 इति 32:17

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारिले. हा बेसुंती पलिष्टी त्यातील एकासारखा होईल कारण, त्यांने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे.”

अश्शूरच्या राजाने इतर देशांचे काय केले ते तुम्ही ऐकलेच आहे. आम्ही ते पूर्ण धुळीला मिळवले. तेव्हा तुम्हीच तेवढे वाचणार का? नाही.

हिज्कीयाने जासूदांच्या हातून पत्र घेऊन ते वाचले. मग परमेश्वराच्या मंदिरात जाऊन परमेश्वरापुढे ते उघडून ठेवले.

माझ्याविरुध्द तू उठलास, तुझे उन्मत्त बोलणे मी ऐकले. तेव्हा, मी आता तुझ्या नाकात वेसण घालतो आणि तोंडात लगाम अडकवतो. मग तुला माघारे वळवून ज्या रस्त्याने आलास त्याच वाटेने तुला परत फिरवतो.”

कुऱ्हाड तिचा उपयोग करणाऱ्यापुढे घमेंड करील काय? करवत तिला चालवणाऱ्यापेक्षा अधीक फुशारकी मारेल काय? काठी उगारणाऱ्याला काठीने उचलावे किंवा लाकडी दांड्याने एखाद्याला उचलावे तसे हे आहे.

तू कोणाची निंदा आणि अपमान केलास? आणि कोणाविरूद्ध आवाज उंच केलास आणि आपले डोळे गर्वाने उंचावले? इस्राएलाच्या पवित्र प्रभूच्या विरुध्द.

त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणाऱ्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.