TSK

TSK · 2 इति 32:25

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

हे धन मी माझ्या बळावर आणि कुवतीवर मिळवले असे चुकूनसुद्धा मनात आणू नका.

¶ इस्राएलवर परमेश्वराचा पुन्हा एकदा कोप झाला. आणि त्याने दावीदाला इस्राएलांविरुध्द चेतवले. दावीद म्हणाला, “आधी इस्राएल आणि यहूदा यांची शिरगणती करा.”

“तू अदोमचा पराभव केलास हे खरे, म्हणून तुझ्या मनाने तुला उंचावले आहे. तू त्याविषयी गौरव करीत घरी राहा, तू पडशील आणि तुझ्याबरोबर यहूदाचाही पाडाव होईल असा तू अरिष्टांशी झगडा का करावा?”

हिज्कीयाने त्याच्याकडून आलेल्या मनुष्यांचे आगतस्वागत केले. त्यांना आपल्या घरातील सर्व मौल्यवान वस्तू दाखवल्या. सोने, चांदी, मसाल्याचे पदार्थ, किंमती अत्तरे, शस्त्रास्त्रे असा आपला सर्व खजिना त्यांना दाखवला. आपल्या घरातील आणि राज्यातील कोणतीही गोष्ट त्याने त्यांना दाखवायची शिल्लक ठेवली नाही.

तीन वर्षाचा दुष्काळ पडावा, किंवा तीन महिने तुझ्या शत्रूने तलवारीने तुझा पाठलाग करावा आणि तुझा नाश करावा किंवा इस्राएलाच्या सर्व देशात परमेश्वराचा दूत लोकांचा संहार करीत असताना देशात तीन दिवस परमेश्वराची तलवार म्हणजे मरी असावी? तर आता, ज्याने मला पाठवले, त्यास मी काय उत्तर द्यावे ते तू ठरवून मला सांग.”

पुढे राजा आणि हे सरदार यांनी परमेश्वर देवाच्या मंदिराचा त्याग केला. त्यांचे पूर्वज या परमेश्वर देवाला शरण गेले होते पण यांनी अशेरा देवीचे खांब आणि इतर मूर्ती यांची पूजा सुरु केली. राजा आणि सरदार यांच्या या अपराधांमुळे यहूदा आणि यरूशलेमेच्या लोकांवर देवाचा कोप झाला.

पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला.

परमेश्वराने माझ्यावर केलेल्या सर्व उपकाराची मी कशी परतफेड करू?

“मानवाच्या मुला, सोरेच्या राज्यकर्त्याला सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, तुझे हृदय गर्विष्ठ आहे. तू म्हणाला मी देव आहे. मी समुद्राच्या हृदयामध्ये देवाच्या आसनावर बसलो आहे. जरी तू मानव आहेस व देव नाही, तरी तू आपले हृदय देवाच्या हृदयासारखे करतो.

तुझ्या सौंदर्यांने तुझे हृदय गर्विष्ठ बनले. तुझ्या वैभवामुळे तू तुझ्या ज्ञानाचा नाश करून घेतला आहे. मी तुला खाली जमिनीवर फेकले आहे. राजांनी तुझे जाहीर प्रदर्शन पाहावे यासाठी मी तुला त्यांच्यापुढे ठेवले.

तर स्वर्गीय प्रभूशी तू उद्दामपणा केलास त्याच्या मंदीरातील सुवर्णपात्र त्यांना आणून तू, तुझे सरदार, तुझ्या पत्नी, आणि तुझ्या उपपत्नी त्यामधून द्राक्षरस प्याला आहात आणि सोने, चांदी, पितळ, लोखंड, लाकूड, आणि दगड हयापासून बनलेल्या मूर्ती ज्या पाहत नाहीत ऐकत नाहीत, किंवा समजत नाही त्यांचे तू स्तवन केलेस पण ज्याच्या हातात तुझा जीव आहे व जो तुझे सर्व मार्ग जाणतो त्या देवास मान दिला नाहीस.

कबुलीच्या शब्दासोबत परमेश्वराकडे वळा, त्यास म्हणा, आमचे अधर्म दूर कर आणि दयेने आमचा स्वीकार कर म्हणजे आम्ही तुझी स्तुती करु, आपल्या ओठांचे फळ तुला अर्पू.

येशू त्यास म्हणाला, ‹“दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत?›

तो या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.