TSK

TSK · 2 इति 32:30

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

राजा त्यांना म्हणाला, माझ्या अधिकाऱ्यांना सोबत घ्या. माझा पुत्र शलमोन याला माझ्या स्वत:च्या खेचरावर बसवून खाली गीहोनाकडे जा.

मग सादोक याजक आणि नाथान संदेष्टा यांनी गीहोन येथे शलमोन राजाला अभिषेक केला. यानंतर ते सर्वजण आनंदाने नगरात परतले, नगरातील लोक त्यामुळे फार आनंदात आहेत. हा जल्लोष त्यांचाच आहे.

जखऱ्याच्या हयातीत उज्जीयाने देवाचे अनुसरण केले. आदरपूर्वक परमेश्वरास मानणे त्यास जखऱ्याने शिकवले, उज्जीया असे वागत असे तोपर्यंत परमेश्वर देवाने उज्जीयाचे कल्याण केले.

झरे आणि आपल्या प्रांतामधून वाहणारी नदी लोकांनी एकत्र येऊन अडवली. ते म्हणाले, “अश्शूरच्या राजाला आत्ता इथवर आल्यावर त्यास मुबलक पाणी का मिळावे?”

¶ आशीर्वादित आहे तो मनुष्य, जो दुष्टांच्या सल्ल्याने चालत नाही, किंवा पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही, आणि थट्टा करणाऱ्यांच्या सभेत बसत नाही.