“तिथे तू महायाजक हिल्कीया याच्याकडे जा. द्वारपालांनी लोकांकडून गोळा केलेले पैसे या याजकाकडे जमा व्हायला हवेत. हा परमेश्वराच्या मंदिरात जमा झालेला पैसा आहे.
TSK
TSK · 2 इति 34:9
Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.
पेटी भरली की लेवी राजाच्या कारभाऱ्यांकडे ती जमा करत. पैशाने भरलेली ती पेटी पाहून राजाचे सचिव आणि मुख्य याजकाचा कारभारी येऊन त्यातले पैसे काढून घेत. पेटी पुन्हा पहिल्या जागी नेऊन ठेवली जाई. असे अनेकदा होऊन मुबलक पैसा जमा झाला.
एफ्राइम, मनश्शे, इस्साखार आणि जबुलून इथून आलेल्या बऱ्याच लोकांनी वल्हांडणासाठी योग्य तऱ्हेने स्वत:चे शुद्धीकरण केलेले नव्हते. ही पध्दत मोशेच्या नियमशास्त्राला सोडून होती. पण हिज्कीयाने त्यांच्या वतीने प्रार्थना केली.
परमेश्वराच्या मंदिरातील पैसा लेवी बाहेर आणत असताना हिल्कीया या याजकाला मोशेद्वारे आलेला नियमशास्त्राचा ग्रंथ सापडला.
आणि हिल्कीया, शाफानचा पुत्र अहीकाम, मीखाचा पुत्र अब्दोन, चिटणीस शाफान आणि आपला सेवक असाया यांना योशीयाने आज्ञा केली की.
या उत्सवा निमित्त योशीयाच्या सरदारांनीदेखील लोकांस, लेवींना आणि याजकांना पशूंचे आणि वस्तूंचे मुक्त वाटप केले. मुख्य याजक हिल्कीया, जखऱ्या आणि यहीएल हे देवाच्या मंदिराचे प्रमुख कारभारी होते. त्यांनी दोन हजार सहाशे शेरडेमेंढरे आणि तीनशे बैल एवढे पशू वल्हांडणाचे बली म्हणून याजकांना दिले.