TSK

TSK · 2 शमु 1:2

Treasury of Scripture Knowledge references in मराठी IRV.

पॅसेजकडे परत

तिसऱ्या दिवशी अब्राहामाने वर पाहिले आणि दूर अंतरावर ती जागा पाहिली.

रऊबेन त्या खड्ड्याकडे परत गेला, तेव्हा पाहा, त्यामध्ये त्यास योसेफ दिसला नाही. त्याने आपली वस्त्रे फाडली.

त्यांनी उत्तर दिले, “तुमचा दास, आमचा बाप, सुखरूप आहे. तो अजून जिवंत आहे.” त्यांनी खाली वाकून नमन केले.

त्यादिवशी एक बन्यामिनी पुरुष आपली वस्त्रे फाडून आपल्या मस्तकावर धूळ घालून सैन्यांतून शिलो येथे धावत आला.

पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला.

यापूर्वीही एकदा आपण चांगली बातमी आणली आहे असे वाटून एकाने मला सांगितले, पाहा शौल मेला त्यास वाटले या बातमीबद्दल मी त्यास बक्षीस देईन पण मी त्यास धरून सिकलाग येथे ठार केले.

मग तकोवा येथील स्त्री राजाशी बोलली. तिने स्वत:ला जमिनीवर लवून व राजापुढे नतमस्तक होऊन ती म्हणाली, कृपाकरून मला मदत करा.

अरवनाने राजाला आणि त्याच्या सेवकांना येताना पाहिले. त्याने पुढे होऊन जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला.

¶ तिसऱ्या दिवशी एस्तेरने आपली राजवस्त्रे परिधान केली आणि ती राजमहालाच्या आतल्या भागात जाऊन उभी राहिली. राजमंदिरात घराच्या दरवाजासमोर राजा सिंहासनावर बसला होता.

दोन दिवसानंतर तो आम्हास पुन्हा जिवंत करेल, तिसऱ्या दिवशी उचलून उभे करेल, आणि आम्ही त्याच्या समोर जिवंत राहू.

‹कारण योना जसा तीन दिवस व तीन रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता तसा मनुष्याचा पुत्र तीन दिवस व तीन रात्री पृथ्वीच्या पोटात राहील.›

‹पाहा, जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.›